सोनम विरुद्ध कंगनाने फुंकले रणशिंग
महा एमटीबी   08-Oct-2018

 

 

 
 
 
मुंबई : बॉलिवुडसाठी वादविवाद काही नवे नाहीत. अभिनेत्री कंगना रनोत आणि अभिनेत्री सोनम कपूर यांच्यात नवा वाद निर्माण झाला आहे. फिल्ममेकर विकास बहल विरुद्ध गैरवर्तनुकीचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीच्या पाठीशी कंगना खंबीरपणे उभी राहिली. परंतु याप्रकरणी प्रतिक्रिया देताना सोनम कपूरने कंगनावर ताशेरे ओढले.
 

कंगना सगळ्याच गोष्टींविषयी आपले मत व्यक्त करत असते. कधी कधी कंगनाने म्हटलेल्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहणे किंवा त्यांवर विश्वास ठेवणे देखील जड जाते. कंगनाचा ज्या गोष्टींवर विश्वास आहे त्याच गोष्टी ती बोलते. सोनमच्या या विधानाला प्रत्युत्तर देत कंगनाने म्हटले की “मी इथे #Metoo मोहिमेबद्दल बोलत आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाला मी वाचा फोडत आहे. माझ्याबद्दल असे चुकीचे मत बनविण्याचा अधिकार सोनमला कोणी दिला ?” असा सवाल कंगनाने सोनमला केला. तसेच सोनम ही तिचे वडिल अनिल कपूर यांच्यामुळे बॉलिवुडमध्ये आहे. मी मात्र अभिनेत्री बनण्यासाठी बॉलिवुडमध्ये नाव कमाविण्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. खूप मेहनत केली आहे. असे बोलून कंगनाने सोनम विरोधात आता नवे रणशिंग फुंकले आहे. सोनम आता कंगनाच्या या विधानाला कशाप्रकारे प्रत्युतर देणार? हे पाहण्याजोगे ठरेल. बॉलिवुडमध्ये नाव कमवायचे असेल तर गॉडफादर हा असावाच लागतो. असे वक्तव्य करत ‘कॉफी विथ करन’ या टॉक शो मधून कंगना राणावतने सर्वात आधी ‘नेपोटिझम’ला वाचा फोडली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/