सलीम-सुलेमान यांचा मराठीत ‘प्रवास’
महा एमटीबी   08-Oct-2018

 

 

 
 
 
मुंबई : आजवर बॉलीवुडमधील अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी चित्रपटात उमटवली आहे. त्यांच्या आवाजातील मराठी गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मांदियाळीत हिंदी सिनेसृष्टीतील आणखी एक आघाडीची संगीतकार जोडी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. गायक-संगीतकार सलीम-सुलेमान मर्चंट या दोघांचीही आपली अशी एक खास ओळख आहे. या जोडीने हिंदी सिनेमांसाठी गेली अनेक वर्षे गायक-संगीतकार म्हणून काम केले आहे. हिंदी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध जोडी आता मराठी सिनेमात संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहे. शशांक उदापूरकर दिग्दर्शित प्रवास या आगामी मराठी सिनेमात त्यांच्या संगीताची जादू मराठी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
 

चक दे इंडिया, तक छप्पन’, दोस्ताना’, धूम २’, ‘फॅशन’, ‘सिंग इज किंग,मुझसे शादी करोगी’, ‘आजा नचले’ ‘इक्बाल, हम तुमयासारख्या असंख्य गाजलेल्या सिनेमातील सलीम-सुलेमान यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांवर गारूड केले. आता मराठीतही आपला जलवा दाखवायला ते सज्ज झाले आहेत. ‘प्रवास’ सिनेमातील गाण्याच्या निमित्ताने संगीतकार सलीम- सुलेमान, गायक सोनू निगम आणि गीतकार गुरु ठाकूर हे कला क्षेत्रातील तीन गुणी कलावंत एकत्र आले. या गाण्याचं रेकोर्डिंग नुकतंच संपन्न झाले. प्रवास’ सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारे सलीम- सुलेमान सांगतात की, आमच्यासाठी हा खूपच वेगळा अनुभव होता. या निमित्ताने आम्ही मराठी चाहत्यांसाठी गीत-संगीताची अनोखी पर्वणी देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे. ओम छंगानी फिल्म्स निर्मित प्रवास या सिनेमाच्या लेखन व दिग्दर्शनाची धुरा शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. तर छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/