कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ वीज बिलमुक्त होणार ः मुख्यमंत्री फडणवीस
महा एमटीबी   08-Oct-2018
 
जळगाव, ८ ऑक्टोबर :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ वीज बिलमुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठ नामविस्तार कार्यक्रमप्रसंगी केली.
 
 
तसेच नंदुरबार ट्रायबल ऍकॅडमीसाठी ५ कोटी रुपये प्रतिवर्ष प्रमाणे २५ कोटी निधी, विद्यापीठात २०० क्षमता असलेले मुला - मुलींचे वस्तीगृह, ४ ग्रीन व्हेकल, गिरणानदीचे पाणी विद्यापीठासाठी राखीव करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.