भारतीय वायुसेना दिन
महा एमटीबी   08-Oct-2018

 


 
 
 
भारतीय वायुसेना सेनेचा आज ८६ वा स्थापनादिवस! वायुसेना हे भारतीय सुरक्षा दलाचे एक अंग असून वायुसेनेमुळेच आज भारताच्या हवाई सीमा सुरक्षित आहेत. तसेच युद्धप्रसंगी हवाई मार्गाने भारताचे संरक्षण करणे व भारताच्या बाजूने शत्रूदेशाशी लढणे हे आपले परम कर्तव्य वायुसेना चोख बजावत असते. केरळ येथील महापूरासारख्या आपत्तीकाळात वायूसेनेने केलेली मदत वाखाणण्याजोगी आहे. जेव्हा केव्हा देशावर संकट आले आहे तेव्हा वायूसेना ही भारताच्या मदतीलातातडीने धावून आली आहे. पण भारतीय वायूसेनेविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
 

१. भारतीय वायूसेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी वायूसेना आहे. भारतीय वायूसेनेत एकूण १,७०,००० कर्मचारी कार्यरत असून १,५०० लढाऊ विमाने आहेत.

 

 
 
 
२.  जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांमध्ये वायूसेनेचा सातवा क्रमांक लागतो. भारतीय वायूसेना ही जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांतील हवाई दलांच्या तुलनेत जास्त शक्तिशाली आहे.
 
 

 
 
 
३. ‘नभ: स्पृशं दीप्तम’ हे वायूसेनेचे ब्रीदवाक्य भगवतगीतेच्या ११ व्या अध्यायातून घेण्यात आले आहे.
 
 

 
 
 
४. तजाखिस्तान या देशातही भारतीय वायूसेनेचे एअर फोर्स स्टेशन आहे.
 
 

 
 
५. ६,७०६ मी उंच सियाचिन ग्लेशिअरवर देखील वायूसेनेचे एअर फोर्स स्टेशन आहे.
 
 
 
 
६. उत्तराखंड येथे पुरस्थिती दरम्यान वायूसेनेने केलेल्या बचावकार्याची जागतीक विक्रमात नोंद करण्यात आली होती.
 
 
 
 
 
 
७. ‘ऑपरेशन राहत’ हे भारतीय वायूसेने केले जगातील आजवरील सर्वात मोठे नागरी बचावकार्य आहे.
 
 
 

 
 
८. दिल्ली येथे वायूसेनेचे स्वत:चे संग्रहालय आहे.
 
 
 
 
 
९. लढाऊ विमानांसाठी वैमानिक म्हणून वायूसेना महिलांना नेहमीच प्रोत्साहन देत आली आहे. वायूसेनेत सध्या ३०० महिला वैमानिक कार्यरत आहेत.
 

 
 
१०.  वायूसेनेची संपूर्ण भारतात ६० पेक्षा अधिक हवाईतळ आहेत. 
 
 

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/