सोनम कपूरला उद्धटपणाची शिक्षा, सोडावे लागले ट्विटर
महा एमटीबी   06-Oct-2018

 

 

 
 
 
मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरच्या उद्धटपणाची झलक सोशल मीडियावर पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. सोनमने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. सोनम एका ठिकाणी जात होती. २ तास होऊन गेले तरीदेखील ती तेथे पोहोचली नव्हती. त्यामुळे वैतागून सोनमने याचे खापर शहरातील रस्त्यांवर फोडले. तसेच रस्ते खराब असल्याची तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केली होती. सोनमच्या या पोस्टला अनंत वासू या सोशल मीडिया यूजरने उत्तर दिले.
 
 
 
 

तुमच्यासारखे लोक सार्वजनिक वाहनांचा वापर किंवा कमी इंधन लागणाऱ्या गाड्यांचा वापर करत का नाहीत? तुझी आलिशान गाडी केवळ ३ ते ४ किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देते. तुझ्या घरातील १०-१२ एसी हे जागतिक तापमानवाढीस जबाबदार आहेत. त्यामुळे सर्वात आधी तू तुझ्यापासून होणारे प्रदूषण कमी कर. असा सल्ला अनंतने सोनमला दिला. त्यावर सोनमने प्रत्युत्तर देत म्हटले की तुझ्यासारख्या पुरुषांमुळे महिला सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यास घाबरतात कारण त्यांना छेडछेडीची भीती असते.

 
 
 
 

सोनमच्या या विधानावर अनंत शांत बसला नाही. त्याने पुढे तिला म्हटले की तुझ्या या विधानामुळे मी तुला कोर्टात खेचू शकतो. कारण मला माझ्या देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे. मी तुझ्यासारखा पदवीविना न्यायधीश नाही.’ सोनम आणि अनंत यांच्यात ही खडाजंगी चांगली रंगली. सोनम विनाकरण पुरुषांवर आरोप करत असल्याची टीका सोशल मीडिया यूजर्सनी केली. अखेर सोनम कपूरने आपले ट्विटर अकाऊंट बंद केले. सोशल मीडिवर खूप नकारात्मकता पसरल्याने मी काही काळासाठी ट्विटरपासून दूर राहीन. सगळ्यांना शांती आणि प्रेम. असे ट्विट सोनमने केले.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/