जळगावच्या श्रद्धा लढ्ढा (मुंधडा) यांनी भारताला मिळवून दिले रजत पदकआठव्या एशियन योग स्पोर्टस् चॅम्पियनशिप’ स्पर्धेतील पेअर आर्टिस्टिकमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन
महा एमटीबी   06-Oct-2018
 
 

जळगावच्या श्रद्धा लढ्ढा (मुंधडा) यांनी भारताला मिळवून दिले रजत पदक
आठव्या एशियन योग स्पोर्टस् चॅम्पियनशिप’ स्पर्धेतील पेअर आर्टिस्टिकमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन

जळगाव, 6 ऑक्टोबर
तिरूअनंतपुरम् (केरळ) येथे नुकत्याच झालेल्या ‘आठव्या एशियन योग स्पोर्टस् चॅम्पियनशिप २०१८’ स्पर्धेत ‘पेअर आर्टिस्किट’ या प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करीत श्रद्धा लढ्ढा (मुंधडा) व धनश्री लेकुरवारे यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिले. प्रथम व्हिएटनाम (सुवर्ण), द्वितीय भारत (रौप्य), तृतीय इराणचा (कांस्य) संघ आला.
 
 
स्पर्धेत भारतासह व्हिएटनाम, मलेशिया, ईराण, सिंगापूर, थायलॅण्ड, युएई, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग, श्रीलंका यासह एकूण १५ देशातील स्त्री-पुरुष स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कम्पलसरी योगासन, रिदेमिक योगासन, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर, फ्री फ्लो योगा डान्स आणि प्रोफेशनल योगासन आदी प्रकारांचा स्पर्धेत समावेश होता.
 
 
भारतातर्फे श्रद्धा लढ्ढा (मुंधडा) यांनी आर्टिस्टिक सिंगलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत चौथे स्थान प्राप्त केले. प्रथमस्थानी भारत, द्वितीय व्हिएटनाम, तृतीय इराण होता. यानंतर झालेल्या पेअर आर्टिस्टिक प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करीत श्रद्धा लढ्ढा
(मुंधडा) व धनश्री लेकुरवारे यांनी भारताला रौप्य पदक प्राप्त करून दिले.
स्पर्धेत भारताने सर्वाधिक पदके प्राप्त करून चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे केली. व्हिएटनाम व दुबईने संयुक्त द्वितीय तर मलेशिया तृतीय स्थानी राहिले.
 
श्रद्धा लढ्ढा (मुंधडा) या जळगाव येथील माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व एमआयडीसीतील प्रसिध्द उद्योजक रवींद्र लढ्ढा आणि ज्योती लढ्ढा यांच्या सून आणि उद्योजक रुपम लढ्ढा यांच्या पत्नी आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.