रजनीकांतचा ‘हा’ लूक पाहिलात का?
महा एमटीबी   06-Oct-2018

 

 

 
 
 
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘पेट्टा’ या सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पिळदार मिश्या, निळेशार डोळे आणि दाक्षिणात्य पारंपारिक वेशातील रजनीकांत, हे या पोस्टरमध्ये खूपच तरुण दिसत आहेत. रजनीकांत यांचे वय ६७ आहे. गेली अनेक वर्षे दक्षिणेकडील सिनेसृष्टीवर आणि प्रेक्षकांवर रजनीकांत आपली जादू कायम ठेवून आहेत.
 
 
 
 

‘पेट्टा’ हा त्यांचा आगामी सिनेमा असून कार्तिक सुब्बाराज हे त्याचे दिग्दर्शन करत आहेत. दक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर या सिनेमाला संगीतबद्ध करत आहे. रजनीकांत आणि दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज यांच्यासह काम करण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘पेट्टा’ हा रजनीकांत यांचा १६५ वा सिनेमा आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री त्रिशा कृष्णन रजनीकांत यांच्यासोबत या सिनेमात दिसणार आहे. तसेच बॉलिवुड अभिनेता नवाझउद्दीन सिद्दीकीही या सिनेमात काम करत आहे. पुढच्या वर्षी ‘पेट्टा’ हा सिनेमा प्रदर्शित होत असून या वर्षाअखेरीपर्यंत सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण करण्यात येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/