वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात भारताने मोडीत काढले 'हे' विक्रम
महा एमटीबी   05-Oct-2018


 


राजकोट: राजकोट येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या दोन दिवसात अनेक विक्रम मोडीत काडले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिज संघाचे ६ गडी बाद ९४ अशी धावसंख्या होती. त्यापूर्वी भारतीय संघाने ९ गडी बाद ६४९ वर डाव घोषित केला होता. या दोन दिवसाच्या खेळामध्ये अनेक विक्रम केले रचले गेले:

 

> भारताने १०व्यांदा ६०० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

 

> कसोटीमध्ये लहान वयात पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा पहिलाच भारतीय ठरला.

 

> पदार्पणात ९९ चेंडूंमध्ये शतक ठोकून त्याने अब्बास अली बैग यांना मागे टाकले.

 

> विराट कोहलीने कारकिर्दीतला २४वे शतक साजरे केले. ७२ कसोटी सामन्यांमध्ये २४ शतके पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

 

> विराटने जगातील इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा कमी कसोटी सामने खेळून २४ शतकांचा टप्पा गाठला आहे.

 
>ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपलनं ८७ सामन्यांमध्ये तर, पाकिस्तानच्या जावेद मियाँदादनं १२४ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला होता. या सगळ्यांना मागे टाकत विराटनं ७२ सामन्यांमध्येच ही कामगिरी केली आहे.
 

>ऋषभ पंतने ८४ चेंडूंमध्ये झंझावती ९२ धावा केल्या. त्याने १०९.५२ सरासरीने ९२ धावा केल्या ज्यामध्ये ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

 

>रवींद्र जडेजाने कसोटी कारकिर्दीतले पहिले शतक साजरे केले. त्याने ३७ सामन्यानंतर आपले हे शतक साजरे केले.

 

> रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांनी नवव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली.

 

> वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना बिशू याने ५४ शतकांमध्ये ४ विकेट घेतल्याचं पण २१७ धावा देऊन एक वेगळेच द्विशतक बनवले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/