‘मी शिवाजी पार्क’चा ट्रेलर रिलीज
महा एमटीबी   05-Oct-2018

चित्रपटात दिसणार दिग्गजांची मांदियाळी 
 

मुंबई : न्यायदेवता आंधळी असते...आम्ही डोळस होतोअशी टॅगलाईन असलेल्या मी शिवाजी पार्कया चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटच्या ट्रेलरवरून यात काहीतरी गहन विषय मांडण्यात आल्याची झलक पाहायला मिळत आहे. वृद्ध व्यक्ती अन्यायाविरुद्ध लढताना दाखवले आहेत. मात्र या चित्रपटाची कथा काय असणार आहे. याबाबत दिग्दर्शकाने न दाखवता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचा नेमका विषय काय हे १८ ऑक्टोबरला चित्रपटगृहात जाऊन बघावे लागणार आहे.

 
 
 

मी शिवाजी पार्कया चित्रपटात विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर हे दिग्गज एकत्र दिसणार आहेत. त्याचबरोबर उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस आदि बरेच कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. गौरी पिक्चर्स प्रोडक्शनमहेश मांजरेकर मूव्हीजच्या या चित्रपटाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून, मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/