अंगावर काटा आणणारा ‘केदारनाथ’ चा टीझर
महा एमटीबी   30-Oct-2018

 


 
 
 
मुंबई : बहुचर्चित ‘केदारनाथ’ या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहे. केदारनाथ येथे झालेला निसर्गाचा प्रकोप या सिनेमात दाखविण्यात आला आहे. सारा अली खानसोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसेल. अभिनेता जॅकी भगनानी देखील या सिनेमात प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना दिसेल.
 
 
 
 

 

केदारनाथ मध्ये आलेल्या महापूरादरम्यान घडणारी प्रेमकथा या सिनेमातून दाखविण्यात आली आहे. केदारनाथ मंदिरा पर्यंत लोकांना पाठीवरून घेऊन जाणाऱ्या पिठ्ठूची भूमिका सुशांत सिंह राजपूतने साकारली आहे. त्याचसोबत तो गाईडचे काम करतानाही दिसतो. एका मुस्लिम तरुणाच्या भूमिकेत सुशांत दिसणार आहे. तर साराने एका हिंदू तरुणीची भूमिका साकारली आहे. केदारनाथमध्ये आलेल्या या महापूरात सुशांत मंदिरातील नंदीचे शिंग धरून आधार घेताना या टीझरमधून दिसतो. केदारनाथचे माहात्म्यही या सिनेमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चहुबाजूंनी येणारे पाणी, ढगफुटी, कडाडणारी वीज, मुसळधार कोसळणारा पाऊस असे निसर्गाचे रौद्र रूप या टीझरमधून पाहायला मिळते. त्यादरम्यान या महापुरातील पाण्यात अडकलेले केदारनाथ यात्रेतील भक्तगण आपला बचाव कसा करतात? त्यांचा हा थरार या टीझर मधून पाहायला मिळतो. स्पेशल इफेक्टसमुळे हा थरार अंगावर अक्षरश: काटा आणतो. येत्या ७ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/