'प्रेम योगायोग'चा नारळ फुटला!
महा एमटीबी   30-Oct-2018


 


फ्रेश, कलरफुल आणि युथफुल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार


मुंबई : 'प्रेम योगायोग' या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. या चित्रपटात विक्रांत ठाकरे, मधुरा वैद्य यांच्या मुख्य भूमिका साकारत आहेत. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आपण आजवर अनेकवेळा बघितली आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने अपघाताने प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांची एक आगळी वेगळी कथा पहायला मिळणार असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी सांगितले. अत्यंत फ्रेश, कलरफुल आणि युथफुल असलेला हा चित्रपट प्रत्येकाला आवडेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

सीएमएस एन्टरटेन्मेंटनिर्मिती संस्थेच्या या चित्रपटाची निर्मिती सुशील शर्मा यांनी केली असून सहनिर्मिती मधुरा वैद्य यांची आहे. मराठी चित्रपट निर्मिती करीत असल्याचा आनंद निर्माते सुशील शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. या चित्रपटात अरुण नलावडे, संजय मोने, शुभांगी लाटकर, तन्वी हेगडे यांच्या भूमिका असणार आहेत तर सुशांत शेलार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

'प्रेम योगायोग' या चित्रपटाची कथा-पटकथा नितीन कांबळे यांची असून संवाद जन्मेजय पाटील यांचे आहेत. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत तर छायांकन अनिकेत कारंजकर यांचे आहे. गीतकार स्वप्नील जाधव यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना राजेश सावंत, आनंद मेनन, तृप्ती चव्हाण यांचे संगीत लाभणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/