‘हा’ अभिनेता साकारणार शिवाजी
महा एमटीबी   03-Oct-2018

 


 
 
मुंबई : ‘तानाजी मालुसरे द अनसंग वॉरियर’ या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. अभिनेता अजय देवगण या सिनेमात तानाजी मालुसरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसेल. या ऐतिहासिक सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी सैफ अली खान या अभिनेत्याचे नाव सुचवण्यात आले आहे.
 

शिवरायांच्या भूमिकेसाठी सैफचे नाव या सिनेमातील तानाजी अर्थात अजयनेच सुचवले आहे. सैफ अली खानही अजयच्या प्रस्तावावर गंभीरपणे विचार करत असल्याचे कळते. तसेच या सिनेमातील तानाजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका अजयची रिअल लाइफ पत्नी काजोलच साकारणार असल्याचीही चर्चा आहे. ओम राऊत हा मराठमोळा तरुण या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. यापूर्वी ओमने लोकमान्य एक युगपुरुष या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/