पृथ्वी शॉचे आंतरराष्ट्रीय कसोटीत पहिले पाऊल
महा एमटीबी   03-Oct-2018


 

 

मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्ध गुरुवारपासून चालू होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी अंतिम १२ खेळाडूंचा संघ जाहीर केला. यामध्ये मुंबईकर पृथ्वी शॉ याचा समावेश सलामीवीर म्हणून केला आहे. बीसीसीआयने पहिल्यांदाच सामन्यापूर्वी संघ जाहीर केला आहे. यामध्ये शॉसोबत के. एल. राहुल सलामीला उतरेल.


१८ वर्षीय पृथ्वी शॉ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने १९ वर्षाखालील विश्व चषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. प्रथम श्रेणी सामन्यात त्याने आतापर्यंत ७ शतके आणि ५ अर्धशतके बनवली आहेत. त्याने ५६.७२च्या सरासरीने १,४१८ धाव केल्या आहेत.

 

भारतीय संघाची निवड पाहता संघात पाच गोलंदाजांचा समावेश केला आहे. आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या तीन जणांवर फिरकीची जबाबदारी असेल. तसेच उमेश यादव, शार्दूल ठाकूर आणि मोहमद शमीवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.

 

वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातील अंतिम १२ खेळाडू:

 

पृथ्वी शॉ, के. एल. राहुल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहाणे(उपकर्णधार),चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, आर. आश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकूर.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/