रणबीर आलियाचेही शुभमंगल?
महा एमटीबी   29-Oct-2018

 


 
 
मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. पुढच्या वर्षी या जोडीचे शुभमंगल होणार असल्याचे कळते. सध्या रणवीरचे वडील अभिनेता ऋषी कपूर हे न्यूयॉर्क मध्ये आजारावर उपचार घेत आहेत. त्यामुळे लग्नाची तारीख अद्याप निश्चित नसल्याचे सूत्रांकडून कळते.
 

रणवीर-दीपिका या जोडीनेदेखील नुकतीच लग्नाची घोषणा केली. येत्या डिसेंबर मध्ये त्यांचे लग्न होणार आहे. दीपिकाच्या लग्नाची तारीख निश्चित झाली असल्याने रणबीरही लगीनघाई करत आहे. असे अनेक तर्कवितर्क सध्या सिनेवर्तुळात लावले जात आहेत. रणबीर आणि आलिया हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. सूनेने लग्नानंतर सिनेमात काम करू नये अशी कपूर घराण्याची प्रथा आलिया मात्र मोडणार आहे. लग्नानंतर ती सिनेमातील आपले काम सुरू ठेवणार असल्याचे कळते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/