‘गोमू संगतीने’ या जुन्या गाण्याचा नवा अंदाज पाहिलात का?
महा एमटीबी   29-Oct-2018

 


 
 
 
मुंबई : ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमातील ‘गोमू संगतीने’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. डॉ. काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या ‘हा खेळ सावल्यांचा’ या सिनेमातील हे सुपरहिट ठरलेले गाणे होते. आता अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी या दोघांवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.
 
 
 
 
 

सुबोध भावे आणि प्राजक्ता माळी या दोघांनीही या गाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे या दिग्गजांनी साकारलेल्या गाण्याला परिपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. वेशभूषेपासून ते केशभूषेपर्यंत सगळ्याचे अगदी हुबेहुब सादरीकरण करण्यात आले आहे. युट्यूबवर प्रेक्षकांचा या गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. येत्या ८ नोव्हेंबर रोजी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमातून सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, सुमीत राघवन, आनंद इंगळे, प्रसाद ओक हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/