इन्वेस्ट इंडियाला संयुक्त राष्ट्रातर्फे पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2018
Total Views |
 
 

जिनोव्हा : भारतात गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन देणारी एजन्सी इन्वेस्ट इंडियाला संयुक्त राष्ट्र संघातर्फेतर्फे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन पुरस्कार देण्यात आला आहे. युएन कनव्हेकश्न ऑन ट्रेड एण्ड डेव्हलपमेंट (यूएनसीटीएडी) मंचाच्या उद्घाटन प्रसंगी ही उद्घोषणा करण्यात आली.

 

अर्मेनियाचे राष्ट्रपती अरमन सरकिसियन यांनी इन्वेस्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बागला यांनी सोमवारी जिनोव्हा येथे जागतिक गुंतवणूक मंचावर हा पुरस्कार स्वीकारला. सहा हजाराहून अधिकजणांनी यात सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान पन्नासहून अधिक देशांच्या मंत्र्यांनी सहभागी झाले. यावेळी दक्षिण आफ्रिका आणि लेसोथो या देशातील संस्थांनाही गौरविण्यात आले.

 

जगभरात गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या विविध सरकारी संस्थांमधून या पुरस्कारासाठी निवड केली जाते. भारतात अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी हा सन्मान केल्याचे यूएनसीटीएडीने म्हटले आहे. दिर्घ कालीन गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल हा गौरव करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@