#Metoo : फराह खान ‘त्या’ महिलांच्या पाठीशी?
महा एमटीबी   25-Oct-2018

 


 
 
 
मुंबई : साजिद खान यांच्यावर अभिनेत्री सलोनी चोप्रा हिने लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. पत्रकार करिश्मा उपाध्याय आणि रशेल व्हाईट यांनीदेखील साजिद यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला. साजिद खान यांची बहीण फराह खान यांनी प्रथम साजिदवर आरोप करणाऱ्या महिलांच्या आपण पाठीशी असल्याचे ट्विट केले होते. परंतु आता मात्र प्रसारमाध्यमांशी याविषयी बोलणे फराह खान टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
 

 

 

१२ ऑक्टोबर रोजी फराह खान यांनी याप्रकरणी एक ट्विट केले होते. ही माझ्या कुटुंबासाठी एक अत्यंत वाईट वेळ आहे. आम्हाला कठीण समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. माझा भाऊ जर असा वागला असेल तर त्याने त्याचे प्रायश्चित्य करणे खूप गरजेचे आहे. मी अशा गैरवर्तणूकीचे समर्थन करत नाही. पीडित महिलांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहीन.असे वक्तव्य फिल्ममेकर फराह खान यांनी या ट्विटमधून केले होते. पीडित महिलांच्या बाजूने मी खंबीरपणे उभे राहीन,’ अशी #Metoo च्या बाबतीत आपली भूमिका फराह यांनी सुरुवातीला स्पष्ट केली होती.
 
 
 
 

परंतु आता मात्र प्रसारमाध्यमांशी याविषयी बोलण्याचे फराह टाळत आहेत. याचा प्रत्यय नुकताच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान आला. लेखिका जयश्री शरद यांच्या ‘स्कीन रुल्स’ या पुस्तकाचे प्रकाशन होते. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा आणि मनीष पॉल हेदेखील उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम लगेच आटोपता घेत, घाईगडबडीने फराह खान यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/