पंतप्रधान मोदी यांना यंदाचा सोल शांतता पुरस्कार
महा एमटीबी   24-Oct-2018
 
 

सोल : देशात आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील विकासाबाबत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा सोल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोल शांतता पुरस्कार सांस्कृतिक संस्थेने बुधवारी याबद्दलची घोषणा केली आहे. देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील सामाजिक आणि आर्थिक दरी कमी करण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचे संस्थेने कौतुक केले आहे. त्याशिवाय देशांतर्गत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केलेल्या कठोर आर्थिक सुधारणांचेही कौतूक करण्यात आले आहे.

 

सोल शांतता पुरस्कारासाठी जगभरात शंभरहून अधिक व्यक्तींच्या नावाचा विचार झाल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष चो चुंग-हू यांनी दिली. या निवड समितीत बारा सदस्यांचा समावेश होता. मोदी यांची निवड अगदी योग्य असल्याचे निवड समितने म्हटले. सोल शांतता पुरस्काराचे ते १४ वे मानकरी ठरले आहेत. या पुरस्कारासाठी अनेक आजी-माजी राष्ट्राध्यक्ष, राजकीय नेते, उद्योगपती, अध्यात्मिक गुरु, पत्रकार, कलाकार, खेळाडू तसेच इतर आंतरराष्ट्रीय संस्था यांची नावे विचारात घेण्यात आली होती. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/