नागराज मंजुळेंच्या अभिनयाची ‘नाळ’
महा एमटीबी   24-Oct-2018 
 
 
मुंबई : नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नागराज यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा असून त्यांचा अभिनय यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘सैराट’चे सिनेमॅटोग्राफर सुधाकरन रेड्डी ‘नाळ’चे दिग्दर्शन करत आहेत. नुकतेच या सिनेमाचे ‘जाऊ दे न व हे’ गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात ‘माझा अभ्यासही झाला करून, हवे तर मी घरातील सगळी कामे करतो. पण आता मला खेळायला जाऊ दे’ अशी विनवणी एक चिमुरडा आपल्या आईकडे करताना दिसतो.
 
 
 
 
 

यापूर्वी नागराज यांनी गजेंद्र आहिरे यांच्या ‘द सायलेंस’ या सिनेमात भूमिका साकारली होती. नाळच्या निमित्ताने नागराज मंजुळेंचा अभिनय पुन्हा पाहता येणार आहे. 'फँड्री' आणि 'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी सिनेसृष्टीत मंजुळेंचा 'नाळ' हा तिसरा सिनेमा आहे. तसेच ‘झुंड’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाद्वारे नागराज मंजुळे हे बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहेत. अमिताभ बच्चन हे 'झुंड' सिनेमात काम करत असून या सिनेमाचे चित्रिकरण नागपूरमध्ये होणार आहे. त्यासाठी खास अमिताभ नागपूरात काही दिवस मुक्कामाला राहणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/