‘स्वाध्याय’ सूर्याचा वियोग
महा एमटीबी   24-Oct-2018
 
 
२५ ऑक्टोबर, २००३ रोजी लक्ष्मीपूजनाच्या मंगल मुहूर्तावर पांडुरंगशास्त्री आठवले विदेही झाले. त्यानिमित्ताने... 
 
 

भूतलावर दादांचे आगमन म्हणजे मानवाला वरदान. भक्ती, अध्यात्म स्वाध्यायाचे विश्वरूप दर्शन ८३ वर्षांच्या कालखंडात जगाला घडले. प्रत्येक माणसाला सुख, शांती समाधानाचा मॉल किंवा विक्री केंद्र जगात कुठेही मिळत नाही. हे तीन घटक मिळण्याचे ठिकाण मार्ग म्हणजेस्वाध्याय.’ हा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानेवैश्विक स्वाध्यायपरिवार साकारला. प्रात:प्रार्थना, ध्यान, सायंप्रार्थना, त्रिकाल संध्या यांच्या नियमित गुंजनाने मन, बुद्धी पंचज्ञानेंद्रिये यांना स्नान घडते. त्यावर दादांच्या मंगल प्रवचनाने आंतर्बाह्य शुद्धी होते. अंतरंगात सुप्त सकारात्मक ऊर्जा केंद्रे कार्यान्वित होतात. सततच्या स्वअध्ययनाने वाईट विचार, विकृती, दुष्ट प्रवृत्ती, वाईट सवयी दुर्गुणांची शक्ती क्षीण होत जाते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद मत्सर या सहा विकारांमुळे निर्माण होणारी स्पंदने, भावतरंग यांची गती क्षमता मंदावते. विकारांची शक्ती स्वाध्यायाकडे वळल्यामुळे कार्योत्साह वाढतो. गुणात्मकता साकारते. विचार, वाणी, आचरण, व्यवहार, वृत्ती कृती या सगळ्यांमध्ये शुद्धीकरण ऐक्य घडते. मनोवृत्ती, दृष्टी स्वभावात अकारात्मक परिवर्तन घडते. स्नानाने शरीर स्वच्छ होते. उपासना, प्रार्थनेने मन पवित्र बनते. स्वाध्यायाने बुद्धी निर्दोष बनते. जीवनाचा सर्वांगीण विकास उन्नतीसाठी ऋषी-संतांनी स्वाध्याय दिला. दादांनी तो माणसाच्या अंतरंगात रुजविला. ‘स्वचा अध्याय म्हणजे आपली जीवनपोथी वाचणे, स्वत:ला जाणणे, समजून घेणे, स्वत:ला ओळखणे म्हणजे स्वाध्याय. माणूस आयुष्य सगळ्यांना जाणून घेण्याचा, ओळखण्याचा प्रयत्न करतो; पण स्वत:साठी त्याच्याकडे वेळ नसतो. जो सकाळी झोपेतून उठवतो, स्मृतिदान करतो, भोजनाच्या रुपाने शक्तिदान करतो झोपेच्या रुपाने शांतिदान करतो. त्याच्यासाठीसुद्धा वेळ नाही. माणूस म्हणजे संपूर्ण सृष्टीतील भगवंताची उत्कृष्ट कलाकृती. पण या माणसाचे माणूसपण भंगले, खंगले, विकलांग झाले. दादा म्हणतात, “माणसाचे शरीर म्हणजे सप्तर्षींचा आश्रम. शरीर ही यज्ञीय भूमी आहे. त्याला हलके समजू नका. शरीराला सप्तनद्यांचा संगम देवनगरीसुद्धा म्हणतात. त्यासाठी आत्मचिंतन आत्मानंद प्राप्तीचा ध्यास हवा.”

 
 

स्वाध्याय हे अनमोल अमृत ज्याने अंगिकारले, प्राशन केले त्याचे जीवन धन्य झाले. प्रभातफेरी, भावभक्ती, कृतिभक्ती, स्वाध्याय केंद्र, युवा केंद्र, बालसंस्कार केंद्र, एकांत भक्ती, लोकांतभक्ती, त्रिकाल संध्या ही सर्व माणसांत अध्यात्मिक ऊर्जा पेरून माणसाला सदाचार प्रवृत्त करणारी दालने आहेत. मुंबईस्थित श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेतून प्रवाहित झाली. ‘स्वाध्याय गंगाठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातून भक्तिनिष्ठ क्रांतिकारी प्रयोगांची मालिका जगभर विस्तारली. दादांनी माणसांत जगण्याचे ज्ञान आणि जीवनाचे भान पेरले. त्यामुळे व्यक्ती, कुटुंब, समाज विश्वात माणसांचे नातेसंबंध यात सौहार्द, जिव्हाळा, नि:स्वार्थ प्रेम, आत्मियता समर्पणाच्या नद्या वाहू लागल्या. हृदयाचा हृदयाशी संवाद सुरू झाला. वाड्या, वस्त्या, गावे, खेडी, शहरे, महानगरे सर्वत्र पांडुरंगीस्वाध्यायाच्या पंचरंगी क्रांतीचा अंतर्नाद घुमू लागला. माणसाचा निसर्गाशी सुसंवाद रंगला. पाने, फुले, झाडे, शेते, यंत्रे, देव बनली. स्वाध्याय भक्तीने जीवनाची सर्व दालने, क्षेत्रे प्रांतातील रुढीग्रस्तता, अज्ञान, दंभ, लबाडी, विकृती, अंधश्रद्धा, राजकारण, बनवाबनवीला लगाम लावला, अंधार दूर केला. मी चांगला बनू शकतो, चांगले काम करू शकतो, या शक्यता केंद्रस्थानी ठेवून दादांनी माणसाच्या मन, बुद्धीवर सद्विचार सुसंस्कारांचा अभिषेक सुरू केला. ‘स्वाध्याय केंद्रातून त्याला खतपाणी मिळाले. भावफेरी, भक्तीफेरी कृती-भक्तीने घराघरांतून यशकीर्तीचे चंद्र प्रकटले. अहंपणाची झुल गळाली. उपभोगाची ओढ आटली अन् आसक्तीला विरक्तीचे वरदान लाभले. दादांनी माणसातील माणूस जागा करून दैवी विचारांनी त्याचा दृष्टिकोन बदलला. देव माझ्या देहात राहून माझे रक्त बनवतो. या जाणिवेमुळे माणसांची व्यसने सुटू लागली. निर्व्यसनी झाल्याचे फायदे, लाभ कळल्यामुळे जीवनशैलीत हळूहळू बदल घडू लागला. माझ्या शरीरात रक्त तयार करणारा देव इतरांच्याही देहात आहे, हा समज दृढ झाल्यामुळे इतरांची अडवणूक, शोषण, फसवणूक करण्याला ब्रेक लागला. माणसामाणसांतील व्यवहारात सचोटी निर्माण होऊ लागली. ‘स्वाध्यायाने माणसाचा जीर्णोद्धार केला. दादांनी सुरू केलेलं तळागाळातील जन-मनाचं स्पंदन असलेल्या मराठी, हिंदी गुजराती भाषेतील तत्त्वज्ञान मासिकाने ५२ वर्षे पूर्ण केलेली आहेत, ही विशेष अभिमानाची गोष्ट आहे.

 
 

देहाच्या माध्यमातून ८३ वर्षे दादांनी जे स्वाध्यायाचं विश्वरूप दर्शन घडवलं. त्यामुळे दादा कुणाला योगेश्वर, कुणाला येशूख्रिस्त, कुणाला अल्ला, कुणाला देवदूत, कुणाला सर्वेश्वर, कुणाला परमेश्वर वाटले. पण दादास्वाध्यायींचे वडीलभाऊ म्हणूनच राहिले.

वर्गणी ना शुल्क येथे ना पदाची लालसा,

मानसन्मानी मुका जो वैभवी जो पद्मसा

करीतसे संसार परि हा त्यात राहे मोकळा,

देव ज्यांच्या सुसंस्कृतातून या जगी विस्तारला

स्वार्थाविना हिंडे जगी हा पांडुरंगी काफिला

 
 

स्वाध्याय पंढरीच्या पांडुरंगाने स्वत:कडे वैराग्य ठेवून जगावर खर्या वैभवाचा वर्षाव करीत निसर्ग नियमानुसार २५ ऑक्टोबर, २००३ रोजी आपला देह ठेवला.

 
- सावळीराम तिमदे  
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/