हॅपी बर्थडे! सिद्धार्थ जाधव
महा एमटीबी   23-Oct-2018

 


 
 
 
बिनधास्त बेधडक, विनोदाचे परफेक्ट टायमिंग ज्याला गवसले आहे असा गुणी अभिनेता सिद्धार्थ जाधव याचा आज वाढदिवस! नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही व्यासपीठांवर त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. हिंदी सिनेमांमध्येही सिद्धार्थने आपली विनोदी भूमिका साकारली. हिरो बनण्यासाठी चांगले दिसणे नव्हे तर चांगला अभिनय करता येणे गरजेचे असते हे सिद्धार्थने सिद्ध करून दाखवले. आज वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात सिद्धार्थविषयी काही खास गोष्टी…
 
 
कॉलेज जीवनापासून सिद्धार्थला अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना सिद्धार्थने अनेक एकांकिका गाजवल्या. काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या ‘लोच्या झाला रे’ या सुप्रसिद्ध नाटकात गोलांट्या उड्या खाणारा, इकडून तिकडे उड्या मारणारा सिद्धार्थ प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात राहिला. पुढे हेच नाटक खो-खो या सिनेमाच्या रुपात मोठ्या पडद्यावर आले.
 

 
 
‘तीन तेरा पिंपळपान’ या ई टीव्हीवरील हॉरर कॉमेडी मालिकेतील त्याची भूमिकाही चांगलीच गाजली. सिद्धार्थ जाधव आणि विनोद असे जणूकाही समीकरणच जुळलय, आणि हे समीकरण ज्या सिनेमात असतं तो सिनेमा सुपरहिट ठरतोच हे वारंवार दिसून आलय.
 
 

 
 

बकुळा नामदेव घोटाळे, इरादा पक्का, हुप्पा हुय्या या सिनेमात सिद्धार्थ हिरोच्या भूमिकेत दिसला. टाईमप्लीज सिनेमात त्याने साकारलेला हिम्मतराव अनेकांना भावला. येरे येरे पैसा पैसा हा त्याचा सध्याचा सुपरहिट ठरलेला सिनेमा.

 

 
 
मराठी सिनेसृष्टीतील एक मोठा कलाकार म्हणून सिद्धार्थकडे आज पाहिले जाते. तरीही सिद्धार्थ जाधव हा अभिनेता आपणही मध्यमवर्गीय कुटंबातून पुढे आलेलो आहोत. याची नेहमी सर्वांना आठवण करून देत असतो. आपणही सर्वसामान्यातीलच एक आहोत, असे सांगत स्वत:मधील साधेपणा त्याने आजही जपून ठेवला आहे.
 

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/