व्यापार युद्ध : निर्यातवाढीसाठी सरकारचे प्रोत्साहन
महा एमटीबी   23-Oct-2018


 

एप्रिल-ऑगस्ट दरम्यान निर्यातीत लक्षणीय वाढ

 

नवी दिल्ली : चीन आणि अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार युद्धातून भारताच्या व्यापाराच्या संधी खुल्या व्हाव्यात यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या निर्यातीवर लावल्या जाणाऱ्या सुमारे १८० वस्तूंची निर्यात करण्यासाठी भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. इंजिनिअरींग क्षेत्र, वाहन उद्योग आणि विविध खाद्य पदार्थांचा यात सामावेश आहे. अमेरिकेला केल्या जाणाऱ्या या निर्यातीचा फायदा या क्षेत्रासह रुपया सावरण्यासाठीही होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्यातदारांच्या या यादीमध्ये देशातील मोठ्या वाहन कंपन्या, रासायनिक उत्पादक कंपन्या आदींचा सामावेश आहे. या नव्या यादीनुसार १० अब्ज डॉलरपर्यंतची निर्यात खुली करण्यावर भर दिला जाणार आहे. डॉनल्ड ट्रम्प प्रशासनाकडील आकडेवारीनुसार, चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या अडीचशे अब्ज वस्तूंवर आयातशुल्क वाढवण्यात आले आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये होणारा निम्मा व्यापार ठप्प झाला आहे. याचाच फायदा भारताला उचलता येणे शक्य आहे. वित्तीय तूट भरुन काढण्यातही यामुळे मदत होणार आहे. दरम्यान भारतीय कंपन्यांना याकडे कसे पाहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

आयात आणि निर्यात यांच्यातील दरी कमी करणे हे केंद्र सरकारसमोर सध्याचे आव्हान आहे. चीननेही अमेरिकेकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवले आहे, त्यामुळे भारताला चीनशीही व्यापार वाढवण्याची संधी असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धातून सावरण्यासाठी चीनने भारताची मदत मागितली आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकोनोमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिंगपिंग यांनी बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठी एकत्र येण्याचे देशांना आवाहन केले आहे.

 

व्यापारयुद्धाच्या संधी : सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट २०१८मध्ये अमेरिकेशी २१. अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे तर १५.४० अब्ज डॉलरची आयात झाली आहे. चीन आणि अमेरिकेच्या व्यापार युद्धानंतर ही निर्यात १४. टक्के वाढल्याचे दिसून आले आहे. यात वाहनांचे सुटे भाग, इंजिनिअरींगचे भाग, इलेक्ट्रीक सुटे भाग, रसायने आदींची निर्यात वाढण्याची संधी आहे. चीनशी झालेल्या व्यापारात आयात टक्क्यांनी घटली आहे, तर निर्यात ५० टक्क्यांनी वाढली आहे. यात ३० अब्ज आयात तर . अब्ज डॉलर निर्यात झाली आहे. चीनमध्ये निर्यातीसाठी फळे, सुका मेवा, लोह, स्टील आदी धातू, वाहने आणि त्यांचे सुटे भाग यांची निर्यात वाढण्याच्या संधी आहेत.

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/