'माधुरी'मध्ये शरद केळकरची हटके भूमिका
महा एमटीबी   23-Oct-2018

 


 
 
 
मुंबई : मोहसीन अख्तर निर्मित ‘माधुरी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे पती मोहसीन अख्तर यांच्या मुंबापुरी प्रोडक्शन अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. स्वप्न वाघमारे जोशी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. नुकताच या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. तर अभिनेता शरद केळकर हा प्रेक्षकांना एका हटके रुपात या सिनेमात दिसणार आहे.
 
 
 
 

नुकतेच, शरद केळकरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्सवरुन या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून शरदच्या लूकची आणि भूमिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. ‘माधुरी’ मधील शरद केळकरच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेविषयी बोलताना निर्माते मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, “शरदने जे पात्रं साकारलं आहे त्या पात्राविषयी मी फार विचार केला की मी यासाठी कोणाला कास्ट करु शकतो. कारण हे पात्र प्रेमळ, हँडसम आणि हॉट आहे. शरदची आणि माझी खुप जुनी ओळख आहे. शरदचं काम मी पाहिलंय आणि त्यामुळे माझ्या पात्राच्या ज्या गरजा आहेत त्यात शरद एकदम फीट बसतो. शरदचा अभिनय, त्याचा आवाज, त्याचा लूक या सगळ्या गोष्टी फार कमाल आहेत आणि ‘माधुरी’ मध्ये शरदने अप्रतिम काम केलंय आणि मुळात, प्रेक्षकांना त्याने या कधी नं साकारलेलं पात्रं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील शरदचे काम पाहिल्यावर मला खात्री आहे की शरद मराठी सिनेमामध्ये एक छाप सोडेल इतका त्याचा अभिनय अप्रतिम आहे.” येत्या ३० नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/