मेघा धाडे पुन्हा बिग बॉस मध्ये
महा एमटीबी   22-Oct-2018

 


 
 
मुंबई : हिंदी बिग बॉसमधून अभिनेत्री नेहा पेंडसे घराबाहेर पडली असली तरी आणखी एक मराठमोळा चेहरा प्रेक्षकाना हिंदी बिग बॉसमध्ये पाहायला मिळणार आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिची लवकरच हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. हिंदी बिग बॉसचे हे यंदाचे १२ वे पर्व आहे.
 

मेघा धाडेने मराठी बिग बॉसचे पहिले पर्व चांगलेच गाजवले होते. तिचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मेघाने हिंदी बिग बॉसचे आजवरचे ११ पर्व पाहिले आहेत. बिग बॉस या रिअॅलिटी शोची मेघा ही सर्वात मोठी चाहती आहे. बिग बॉस या कार्यक्रमाशी मेघाचे एक अनोखे नाते आहे. असे मेघाने यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. आत हिंदी बिग बॉसच्या घरात मेघा धाडेच्या येण्याने काय धमाल उडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/