आता कंगनाने घेतला हा नवीन ‘पंगा’
महा एमटीबी   22-Oct-2018

 


 
 
 
मुंबई : अभिनेत्री कंगना रनोटने आता आणखी एक नवा पंगा घेतला आहे. आपल्या आगामी सिनेमा ‘पंगा’ साठी कंगनाने  तब्बल ७ किलोंहून अधिक वजन वाढवले आहे. ऐश्वर्या अय्यर तिवारी दिग्दर्शित 'पंगा' या सिनेमात कंगना एक कबड्डीपटूची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेला परिपूर्ण न्याय देण्यासाठी कबड्डीपटूसारखी शरीरयष्टी कमावण्यासाठी सध्या कंगनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या भूमिकेसाठी कबड्डी या खेळाचे प्रशिक्षणही कंगना घेणार आहे.
 
 

 
 

कंगनाचे कबड्डी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘पंगा’ या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी राझ द मिस्ट्री कन्टिन्यूस या सिनेमासाठी कंगनाने वजन वाढवले होते. एरव्ही सडपातळ बांध्याची कंगना ‘राझ’ सिनेमात एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांना दिसली होती. आता ‘पंगा’च्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना कंगनाचे हे वजनदार रुप पाहायला मिळणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/