अभिनयाची नवी नीती ‘परिणीती’
महा एमटीबी   22-Oct-2018
 
 

 
 
 
अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज वाढदिवस! त्यानिमित्ताने जाणून घेऊया बर्थडे गर्ल परिणीती विषयी काही रंजक गोष्टी!
 

परिणीती चोप्रा ही अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची चुलत बहिण. प्रियांका आणि तिचे एक अनोखे नाते आहे. सध्या परिणीती प्रियांका-निक यांच्या लग्नाची तयारी करत आहे.

 

 
 
अभिनय क्षेत्रात येण्याचा कोणताही प्लॅन नसताना ती अचानक बॉलिवुडमध्ये आली. त्यापूर्वी परिणीती लंडनच्या एका कंपनीत नोकरी करत होती. मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून तिने बिझनेस, फायनान्स आणि इकोनॉमिक्स अशा तीन विषयात पदवी संपादन केली आहे. लंडनमध्ये आलेल्या जागतिक मंदीमुळे परिणीती नोकरी सोडून भारतात परतली.
 
 

 
 

यशराज फिल्मसाठी परिणीतीने मार्केटिंग आणि पीआर कन्सल्टंट म्हणून काम केले आहे. त्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जीची ती पीए बनली. राणी मुखर्जीनेच परिणीतीला अभिनयाकडे वळण्याचा सल्ला दिला.

 

 
 

लेडीज वर्सेस रिकी बहल या सिनेमाने तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमात ती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती. पुढे इश्कजादे सिनेमानंतर परिणीतीच्या अभिनयाची गाडी सुसाट वेगाने धावू लागली.

 

 
 

परिणीती ही एक उत्तम गायिका आहे. संगीतात तिने बीएची पदवी संपादन केली आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ या सिनेमात तिने गायलेले ‘माना के हम यार नही’ हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते.


 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/