‘या’दिवशी होणार रणवीर-दीपिकाचे लग्न
महा एमटीबी   21-Oct-2018

 


 
 
 
मुंबई : बॉलिवुडमध्ये लग्नसराईचा जणू सीझनच सुरू होतोय. यावर्षी अभिनेत्री सोनम कपूर लग्न झाले तर अभिनेत्री नेहा धुपियाही विवाहबद्ध झाली. आता प्रियांका-निक यांच्यापाठोपाठ रणवीर दीपिकानेही आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. १४ आणि १५ नोव्हेंबर असे दोन दिवस हा लग्नसोहळा चालणार आहे. रणवीर आणि दीपिका या दोघांनीही ट्विटरवरून याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर-दीपिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा सिनेवर्तुळात रंगली होती.
 
 
  
 

हा विवाहसोहळा इटली येथील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे संपन्न होणार आहे. लग्नानंतर मुंबई आणि बेंगळुरू अशा दोन्ही ठिकाणी रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे. अभिनेत्री दीपिका पडुकोण ही मूळची बंगळुरूची असल्याने तेथेही लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. अभिनेता रणवीर सिंह सध्या दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सिंबा’ या सिनेमाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. पण दीपिकाने मात्र लग्नाच्या तयारीसाठी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘सपना दीदी’ हा सिनेमा सोडला असून त्याची साइनिंग अमाऊंट परत केल्याची चर्चा आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/