अन्नू मलिक यांना ‘इंडियन आयडॉल’मधून काढले
महा एमटीबी   21-Oct-2018

 

 
 
 
 
मुंबई : सुप्रसिद्ध संगीत रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल’ च्या परीक्षकपदावरून संगीतकार अन्नू मलिक यांना काढून टाकण्यात आले आहे. संगीतकार अन्नू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे चॅनलने म्हटले आहे. परंतु या कार्यक्रमातून आपण ब्रेक घेत आहोत असे अन्नू मलिक यांचे म्हणणे आहे.
  

अन्नू मलिक नसले तरी इंडियन आयडॉल हा शो नेहमीप्रमाणे सुरू राहील. लवकरच विशाल ददलानी किंवा नेहा कक्कड यांना गेस्ट म्हणून या शोमध्ये सहभागी केले जाईल. असे याप्रकरणी चॅनलने म्हटले आहे. गायिका श्वेता पंडित आणि सोना महापात्रा यांसह आणखी दोन अज्ञात महिलांनी संगीतकार अन्नू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. परंतु सध्या जे काही वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे हा सो आणि संगीत क्षेत्रावर एकूणच मला लक्ष देता येत नाही. म्हणून या शो मधून मी बाहेर पडत आहे.” असे अन्नू मलिक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/