रुग्णालयाचा प्रताप, रुग्णाला ठेवले मॅन्युअल व्हेंटिलेटरवर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : सायनच्या शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला चक्क मॅन्युअल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. शकील अहमद असे या ४० वर्षीय रुग्णाचे नाव असून मानखुर्द येथे एका ऑटो रिक्षाने त्यांना धडक दिली होती. या अपघातामुळे शकील गंभीररित्या जखमी झाले होते.
 

त्यांना गोवंडी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तेथे उपचारासाठी कोणतीच उपकरणे उपलब्ध नसल्याने त्यांना तातडीने सायन येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, शकील यांच्या डोक्यातून खूप रक्तस्त्राव झाला होता. तसेच त्यांना श्वसनाचा त्रासही उद्भवला होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करून एक कृत्रिम नळी बसविण्यात आली होती. ही नळी व्हेंटिलेटरला जोडण्यात आली होती त्यामुळे शकील हे याद्वारे श्वास घेऊ शकत होते. परंतु हे व्हेंटिलेटर अचानक बंद पडले. त्यावेळी रुग्णालयातील इतर ११ व्हेंटिलेटरचा इतर रुग्णांसाठी वापर होत होता. त्यामुळे तुम्ही मॅन्युअल व्हेंटिलेटरचा वापर करा. असा सल्ला रुग्णालयाने शकील यांच्या कुटुंबियांना दिला.

 

शकील यांच्या कुटंबियांना एक अंबूबॅगदेण्यात आली. या बॅग सोबत एक पंप असतो. या पंपाद्वारे अंबूबॅगमध्ये हवा भरली जाते.शकील यांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे कुटंबिय सलग आठ तास ही अंबूबॅग पंप करतहोते. त्यांनी जर बॅग पंप केली नसती तर शकील यांचा मृत्यू झाला असता. पण हाजीवघेणा धोका शकील यांच्या कुटंबियांनी पत्करला. व्हेंटिलेटरची सतत मागणी करून देखीलरुग्णालय प्रशासनाने तो उपलब्ध करून दिला नाही. अखेर एका वृत्तसंस्थेच्या पत्रकाराच्याप्रयत्नांमुळे शकील यांना व्हेंटिलेटर मिळवून देण्यात आले. परंतु रुग्णालयानेयाबाबतीत केलेली हलगर्जी शकील यांच्या जीवावरही बेतू शकली असती.          

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@