बीसीसीआय आणि एमसीएमध्ये 'खडाजंगी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2018
Total Views |



मुंबई: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ५ एकदिवसीय सामान्यांची श्रुंखला २१ तारखेपासून सुरु होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मुंबईत होणारा चौथा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना वानखेडे स्टेडियमवरून ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यांच्या या निर्णयाबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

 

“सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या निर्देशानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) यजमानपदाखाली वानखेडे स्टेडियमवर २९ ऑक्टोबरला होणारा एकदिवसीय सामना आता क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला स्थलांतरित करण्यात आला आहे,” असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले होते.एमसीएचे बँक खाते सुरू होऊ न शकल्याने स्टेडियममधील जाहिरात आणि खाद्यपदार्थांच्या सुविधा पुरविण्याबाबतच्या निविदा काढता आल्या नाहीत, या अडचणीचा सामना सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशन करीत आहे. त्यामुळे आर्थिक कोंडीचा सामना करणाऱ्या एमसीएने सामन्याच्या यजमानपदाबाबत असमर्थता दर्शवली होती.

 

उच्च न्यायालयाने बाजू मांडण्यास सांगितले

 

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बीसीसीआय आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांना २४ ऑक्टोबरला आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. २९ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. त्याच्या ५ दिवस आधीच बीसीसीआय आणि सीसीआयला आपली भूमिका मांडावी लागणार आहे. यामुळे सध्यातरी सामन्याच्या आयोजनावर एकप्रकारे टांगती तलवारच आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@