महानायकाचा 'हा' लूक पाहिलात का?
महा एमटीबी   18-Oct-2018

 


 
 
 
मुंबई : नुकताच अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा झाला. आजवर अमिताभ यांनी अनेक हिंदी सिनेमे केले. पण बिग बी आता लवकरच तेलुगू सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ असे या सिनेमाचे नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातून प्रेक्षकांना अमिताभ बच्चन हे एका वेगळ्या लूकमधून दिसणार आहेत.
 

वाढवलेली दाढी,मोकळे सोडलेले केस आणि कपाळावर कुंकवाचा टिळा असा एकूण हा लूक आहे. स्वातंत्र्यसेनानी उय्यालवाडा नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध कलाकार नयनतारा, विजय सेतुपती, तमन्ना भाटिया आणि सुदीप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती दक्षिणेतील मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण तेजा याने केली आहे.

 
 
 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/