रेमंड ग्रुपच्या संस्थापकांना अध्यक्षपदावरुन हटवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018
Total Views |
 

मुंबई : रेमंड ग्रुपचे संस्थापक विजयपथ सिंघानिया आणि त्यांचे पुत्र गौतम सिंघानिया यांच्यातील तणाव गेल्या काही काळापासून वाढतच चालला आहे. सद्यस्थितीतील कंपनीच्या अध्यक्षपदावरुन विजयपथ सिंघानिया यांना हटवल्याचे एका पत्राद्वारे त्यांना कळवण्यात आले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी कंपनी सचिव आणि कंपनी संचालक मंडळाला तक्रार करणारे पत्र लिहिले आहे. कंपनीतील एका संचालकाने सिंघानिया यांना अध्यक्षपदाचा वापर करू नये, असे सांगितले होते. त्याला प्रत्यूत्तर देताना सिघानिया यांनी पदावरुन हटवल्याबाबतचे पुरावे मागितले आहेत.

 

सिंघानिया यांना मिळालेल्या पत्रात कंपनी सचिव थॉमस फर्नांडीस यांचे हस्ताक्षर आहे. यात म्हटल्यानुसार, कंपनी बोर्डने सिंघानिया यांना हटवण्याचा निर्णय घेतला असून याचा कुटूंबातील वादाशी काहीही संबंध नाही. सिंघानिया यांच्या व्यवहारामुळे त्यांना हटवण्याचा निर्यण घेण्यात येत आहे. यापूर्वी ३० ऑगस्ट रोजी विजयपथ सिंघानिया यांनी कंपनी बोर्डाला लिहिलेल्या पत्रात त्यांचा मुलगा गौतम हा त्यांची कंपनीतून हकालपट्टी करण्यासाठी हालचाली करत असल्याचे म्हटले होते.

 

गौतम यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या निर्णयाशी आणि त्यांच्यातील वादाशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांच्या अशा वर्तनावर मी दुःखी असून त्यांच्याशी यावर बोलायलाही मी तयार आहे. माझ्याकडे त्यांची कोणतिही गोष्ट नाही, त्यांना त्यांनी ठेवलेल्या वस्तूंची आठवण राहत नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. ऑगस्ट २०१८मध्ये मुंबई उच्च न्यायालयात या संबधित याचिका दाखल करण्यात आली होती. या मलबार हिल स्थित ३६ मजल्याच्या इमारतीतील एका अलिशान सदनिकेचा ताबा गौतम यांनी त्यांना देण्यात आलेला नाही.

 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@