‘जंगली’चा टीझर पाहिलात का?
महा एमटीबी   17-Oct-2018


 

 
 
 
 
मुंबई : अभिनेता विद्युत जामवाल याचा बहुप्रतिक्षित ‘जंगली’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चक रसेल यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून विद्युतने त्यात एका वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्याची भूमिका साकारली आहे. हत्तींची शिकार थांबविण्यासाठी या वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्याने केलेला संघर्ष या सिनेमात दाखविण्यात आला आहे. सिनेमासाठी विद्युत अनेक दिवस हत्तींसोबत वेळ घालवत होता. त्याची या हत्तींसोबत छान गट्टीही जमली होती.
 
 

 

 

वन्य प्राण्यांची केली जाणारी शिकार, हस्तीदंत आणि प्राण्यांच्या इतर अवयवांची होणारी तस्करी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून एक मोहीम राबवली जात आहे. या मोहीमेबदद्ल आणि वन्यजीवांच्या गंभीर प्रश्नाबाबत या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे.
 
 
 
 

 

सिनेमाचे दिग्दर्शक चक रसेल यांनी यापूर्वी ‘द मास्क’ आणि ‘द स्कॉर्पियन किंग हे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. जंगली पिक्चर्स निर्मित या सिनेमाचे चित्रिकरण थायलंडमधील जंगलात करण्यात आले. ‘जंगली’ हा सिनेमा पुढच्या वर्षी ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/