शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018
Total Views |
 

मुंबई : सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बाजाराच्या तेजीला बुधवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८३ अंशांनी घसरुन ३४ हजार ७८०वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३२ अंशांनी घसरून १० हजार ४५३च्या स्तरावर बंद झाला.

 

दिवसभरात बॅंकींग आणि ऑटो क्षेत्रात विक्री झाल्याने दोन्ही निर्देशांक घसरले. रियल्टी, ऑटो, मेटल, पीएसयू बॅंकींग क्षेत्रातील शेअर घसरले. सेन्सेक्सने ३५ हजार ५४३ अंशांवर उघडून दिवसभरात सर्वाधिक ३५ हजार ६०५ इतका स्तर गाठला होता. निफ्टी १० हजार ६८९ वर उघडून १० हजार ७१० हजारांच्या स्तरावर बंद झाला.

 

दिवसभरात आयटीसी, कोल इंडिया, विप्रो, इन्फोसिस. एचयुएल, पावरग्रीड, कोटक बॅंक आदी शेअर वधारले. येस बॅंक, अदानी पोर्टस्, मारुति, एसबीआय, आयसीआयसीआय बॅंक, टीसीएस, सन फार्मा, रिलायन्स, एचडीएफसी, एशियन पेंट्स, एचडीएफी बॅंक आदी शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. दिवसभरात निफ्टीमध्ये निफ्टी पीएसयू बॅंक इन्डेक्स .४१ टक्क्यांनी, बॅंक निफ्टी .४७ टक्के, निफ्टी ऑटो .९५ टक्के, फायनांशिअल सर्व्हिसे .९९ टक्के, मीडिया .१४ टक्के, मेटल टक्के, फार्मा .५३ टक्के घसरले. निफ्टी आयटी इंडेक्स .४२ टक्के तर एफएमसीजी इंडेक्स .४४ टक्क्यांनी वधारले.

 

रुपया मजबूत

बुधवारी रुपया मंगळवारप्रमाणे मजबूत झाला. पैशांनी मजबूत होऊन रुपया ७३.७१ वर खुला झाला. मंगळवारच्या तुलनेत झालेली वाढ हप्त्यांतील सर्वात मोठी वाढ आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@