‘रिलायन्स’ समुहाला विक्रमी नफा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : तेल रिफायनरी आणि मोबाईल क्षेत्रातील प्रमुख कंपनी रिलायन्ससमुहाने दुसऱ्या तिमाहीत १७.३५ टक्के नफा नोंदवला आहे. चालु वित्तीय वर्षात दुसऱ्या तिमाहीत कंपनीला हजार ५१६ कोटींचा नफा झाला. रिलायन्सउद्योग समुहाच्या इतिहासातील तिमाहीतील हा सर्वाधिक नफा आहे. गेल्या वर्षी हजार १०९ कोटी इतका नफा झाला होता. सप्टेंबर महिन्यातील तिमाहीपर्यंत दरवर्षी ५४. टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

 

नफ्यातील ४४. टक्के वाटा हा पेट्रोकेमिकल्स आणि रिफायनरी उत्पादनांतून झाला आहे. रिफायनरी आणि पेट्रोकेमिल क्षेत्रात नव्याने उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानाचा कंपनीला फायदा झाल्याचे यात म्हटले आहे. रिलायन्स समुह प्रत्येक तिमाहीत मजबूत होत असून कंपनीच्या नफ्यात वाढ होत आहे. कमोडिटी बाजारात येणाऱ्या अस्थिरतेतही आम्ही तग धरू शकलो आहोत.”, असे रिलायन्ससमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले. जिओयेत्या काळात कायमस्वरुपी ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू करण्यावर भर देणार आहे. टेलिकॉम कंपनी जिओने सुमारे हजार २४० कोटींचा महसुल जमा केला आहे. गेल्या तिमाहीत तो हजार १०९ इतका होता. जिओला या तिमाहीत ६१८ कोटींचा नफा झाला आहे. गेल्या तिमाहीत हा नफा ६१२ कोटी इतका होता.

 

हॅथवे आणि डेनमध्ये गुंतवणूक

 

रिलायन्ससमूह हॅथवे आणि डेनया केबल सेवा देणाऱ्या कंपनींशी करार करणार असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. या अंतर्गत कंपनीला जिओगीगाफायबर ही नवी ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यास मदत होणार आहे. हॅथवेमध्ये ५१. टक्के आणि डेननेटवर्कमध्ये ६६ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. यासाठी हॅथवेमध्ये २९४० कोटी आणि डेननेटवर्कमध्ये २०४५ कोटी इतकी गुंतवणूक करणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@