प्रियांका-निक ‘इथे’ करणार लग्न
महा एमटीबी   17-Oct-2018

 

 

 
 
 
मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा गेल्या बराच काळापासून सिनेवर्तुळात रंगली होती. ऑगस्ट महिन्यात या दोघांनी गुपचूप साखरपुडादेखील केल्याचे म्हटले जात होते. अखेर या जोडीने आपल्या नात्याची औपचारिक घोषणा केली असून या वर्षाअखेरीस ते लग्न करणार आहेत.
  

३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. भारतीय पद्धतीने हे लग्न होणार असून त्यासाठी राजस्थानमधील जोधपूर शहराला प्रियांकाने पसंती दिली. जोधपूरमधील एक आलिशान राजमहाल यासाठी निवडण्यात आले आहे. प्रियांका-निकच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. तसेच त्यांचे लग्नही चर्चेचा विषय ठरणार यात शंका नाही. देसी गर्ल आणि विदेशी बॉयच्या या रॉयल वेडींगवर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/