लेखिका अॅना बर्न्स यांना ‘मॅन बुकर’ पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
लंडन : उत्तर आयर्लंड येथील आयरिश लेखिका अॅना बर्न्स यांना यावर्षीचा मानाचा असा ‘मॅन बुकर’ पुरस्कार मिळाला आहे. इंग्रजी साहित्य विश्वात ‘मॅन बुकर’ हा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. अनुवादित इंग्रजी साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची लहान यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. आज लंडनमध्ये पुरस्कार विजेत्याचे नाव जाहीर झाले. ‘मिल्कमॅन’ या कादंबरीसाठी अॅना बर्न्स यांना हा पुरस्कार मिळाला.
 
 
 
 
 
 

ब्रिटिश कवी रॉबिन रॉबर्टसन, डेझी जॉन्सन, अमेरिकन लेखक निक डनासो, मायकल ओदान्शी, अमेरिकन लेखिका रेचन कुशनेर आणि कॅनडियन लेखिका इसाय एडुग्यान हे देखील या पुरस्कारासाठी स्पर्धेत होते. परंतु मागे सारत अॅना बर्न्स यांनी हा मानाचा पुरस्कार पटकावला. या पुरस्काराच्या स्वरुपात ५० हजार पौंड ही रक्कम लेखक आणि अनुवादकांमध्ये समान विभागून दिली जाते. २००५ पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. आधी दर दोन वर्षांनी हा मॅन बुकर पुरस्कार दिला जात असे. २०१६ पासून हा पुरस्कार दरवर्षी देण्यास सुरुवात झाली. ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरी किंवा कथासंग्रहास हा पुरस्कार दिला जातो. मूळ लेखनासह त्याच्या अनुवादनालाही तितकेच महत्व या पुरस्काराद्वारे दिले जाते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@