बीसीसीआयने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय
महा एमटीबी   17-Oct-2018


 


नवी दिल्ली: बीसीसीआयने क्रिकेटपटूंना विदेश दौऱ्यावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयाने कर्णधार विराट कोहलीला दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नी किंवा प्रियसीला विदेशच्या दौऱ्यावर घेऊन जात यावे अशी मागणी केली होती. बीसीसीआयने सुरुवातीला या मागणीला नकार दिला होता मात्र आता काही अटी लागू करून त्यांनी परवानगी दिली आहे.

 

बीसीसीआयनुसार विदेश दौऱ्याचे पहिले १० दिवस पत्नीला किंवा प्रेयसीला सोबत घेऊन जाता येणार नाही. मात्र १० दिवसांनंतर त्या जाऊ शकतात. विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर पत्नी अनुष्का शर्मालासोबत घेऊन गेला होता. तेव्हा पत्नीला किंवा प्रेयसीला विदेश दौऱ्यांवर सोबत घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. यामुळे विराटवर भरपूर टीका करण्यात झाली होती. त्यामुळे पत्नी किंवा प्रेयसीलाही सोबत घेऊन जाण्यास परवानगी असावी अशी मागणी विराटने बीसीसीआयकडे केली होती.

 

काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने अॅशेस कपसाठी खेळाडूंना पत्नी-प्रेयसीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. तेव्हा या नीतीचा ऑस्ट्रेलियाला फायदाही झाला होता. आता येत्या विदेश दौऱ्यात भारताला या नीतीचा फायदा होतो कि नाही हे पाहणे महत्वाचे आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/