तरूण भारत’ अल्पना कला स्पर्धा-२०१८ अंतर्गत रांगोळी स्पर्धेतभडगावला गायत्री पवार प्रथम, ममता परदेशी द्वितीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |
 

 

तरूण भारत’ अल्पना कला स्पर्धा-२०१८ अंतर्गत रांगोळी स्पर्धेत
भडगावला गायत्री पवार प्रथम, ममता परदेशी द्वितीय

भडगाव, १५ ऑक्टोबर
‘जळगाव तरूण भारत’ने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भडगाव येथे सोमवार, १५ ऑक्टोबर रोजी आयोजित अल्पना कला स्पर्धा २०१८ अंतर्गत रांगोळी स्पर्धेत गायत्री संजय पवार हिने प्रथम तर सौ. ममता अतुलसिंह परदेशी यांनी द्वितीय तर अंकिता रुपेश जैन यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर पाच विजेत्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. ही स्पर्धा संत सेना महाराज विठ्ठल मंदिर नाचणखेडा रोड येथे उत्साहात पार पडली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.संजीव पाटील (संचालक दूध संघ जळगाव) होते. तसेच भडगावचे नसरसेवक आणि सिनेट सदस्य अमोल पाटील, भाजप भडगावचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, भडगाव नगरसेविका योजनाताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते याकुब पठाण, ‘तरूण भारत’चे निवासी संपादक दिनेश दगडकर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या स्वागतानंतर डॉ.संजीव पाटील यांनी मनोगतातून त्यांनी सांगितले की, रांगोळीतून अनेक समाजोपयोगी आणि प्रबोधन करणारे विषय साकारले गेल्याने आनंद होत आहे. तसेच रांगोळीतून बेटी बचाओ, बेटी पढाओ असे अनेक संदेश देण्यात आले असल्याने त्यांनी स्पर्धकांचे कौतुक केले.

परीक्षकांतर्फे सुबोध कात्यायन यांनी स्पर्धेचा आढावा घेतला आणि या स्पर्धेचे वैशिष्ट्ये सांगितले. ग्रामीण भागातही समाजोपयोगी विषय रांगोळीच्या माध्यमातून साकारल्याबद्दल त्यांनी स्पर्धकांचे कौतुक केले. डॉ. संजीव पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार गायत्री संजय पवार हिला १००१/रू रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, ममता अतुलसिंह परदेशी यांना द्वितीय पुरस्कार ७०१/रू रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर अंकिता रूपेश जैन ५०१/रू रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तर पाच उत्तेजनार्थ बक्षिसे रुपाली महाजन, वैष्णवी कासार, दीपाली शेवाळे, शेजल जैन, संजना देसले यांना प्रत्येकी १०१/रू रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
परीक्षक म्हणून ज्येष्ठ कला मार्गदर्शक सुबोध कात्यायन (पाचोरा), कला शिक्षिका नयना कापुरे, संस्कार भारती, जळगावच्या रांगोळी विभागाच्या शहरविभाग प्रमुख रेखाताई लढे तसेच वर्षाताई बर्‍हाटे संस्कार भारती रांगोळी विभागाच्या सदस्या यांनी परीक्षण केले. या अल्पना रांगोळी स्पर्धेसाठी डॉ. संजीव पाटील युवा प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य लाभले. यासोबत प्रा.सुरेश कोळी, चुडामण पाटील, राजू शेख, सुनील कासार, सुधाकर पाटील, परेश पाटील, धनराज पाटील, प्रशांत कुंभारे, सचिन पाटील, जावेद शेख ‘तरूण भारत’चे विपणन व्यवस्थापक मनोज बोरसे, भडगाव प्रतिनिधी मनोज पाटील, अनिकेत आफरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केले. स्पर्धकांचे पालक आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.संजीव पाटील यांचे सहकार्य
या स्पर्धेसाठी डॉ.संजीव पाटील युवा प्रतिष्ठान यांनी मोलाचे सहकार्य केले. बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्त्री भ्रृणहत्या आणि अनेकविध विषयांच्या रांगोळ्या पाहून डॉ.संजीव पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
प्रथम, द्वितीय अन् तृतीय पारितोषिक
* प्रथम - गायत्री पवार, १००१/रू रोख,स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र
* द्वितीय - ममता परदेशी ७०१/रू रोख,स्मृतिचिन्ह
* तृतीय - अंकिता जैन ५०१/रू रोख, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र

३५ स्पर्धकांचा सहभाग
रांगोळी स्पर्धेसाठी दुपारपासून स्पर्धकांनी सहभाग घेतला. या रांगोळी स्पर्धेत ३५ स्पर्धक सहभागी झाले होते. अत्यंत आकर्षक रंग, प्रमाणबद्ध रचना आणि सुटसुटीतपणा यातून साकारेल्या रांगोळींनी मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले.

वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार
तसेच वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त भडगाव येथील वृत्तपत्र विक्रेते प्रशांत खांडेकर, राजू दीक्षित, योगेश दीक्षित, देवीदास वाणी, या बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते तरूण भारततर्फे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 
@@AUTHORINFO_V1@@