गोव्यात सत्तास्थापनेच्या काँग्रेसी स्वप्नांना सुरूंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |
 
 

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या काळात सत्ताधारी भाजप आघाडीत फूट पाडून संख्याबळ जुळवत आपली सत्ता आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला मंगळवारी मोठा हादरा बसला. गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे आता काँग्रेसने राज्य विधानसभेतील सर्वात मोठ्या पक्षाचे स्थान गमावले असून भाजप आणि काँग्रेस या दोघांचेही संख्याबळ समसमान झाले आहे.

काँग्रेसचे मांद्रे येथील आमदार दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी मंगळवारी राजीनामे देत सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, काँग्रेसकडून सोमवारी रात्रीच याबाबत बोलताना आम्ही या आमदारांच्या संपर्कात असून ते पक्ष सोडून जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया देण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नाकावर टिच्चून मंगळवारी सकाळीच सोपटे आणि शिरोडकर यांनी भाजपप्रवेश केला. याखेरीज, आणखी - काँग्रेस आमदार येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोटही सुभाष शिरोडकर यांनी केला. या घटनेमुळे आतापर्यंत गोवा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस समुद्रसपाटीवर आला असून भाजप आणि काँग्रेस या दोघांच्याही आता १४ जागा झाल्या आहेत. तसेच, पुढे मांद्रे शिरोड्यात पोटनिवडणूक लागून येथे भाजप निवडून आल्यास भाजपच्या १६ जागा होऊन भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.

मनोहर पर्रीकर हे सध्या स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेत आहेत. गेले काही महिने ते अमेरिका, मुंबई, नवी दिल्ली, अशा विविध ठिकाणी उपचार घेऊन काही दिवसांपूर्वी गोव्यात पुन्हा परतले आहेत. दरम्यानच्या काळात पर्रीकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा फायदा घेत राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा अशा परिस्थितीत तेथे आपली सत्ता आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. याच हेतूने काँग्रेसने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जावा तसेच काँग्रेसला सत्तास्थापनेचा दावा करण्याची संधी देण्यात यावी, अशीही मागणी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे केली होती. भाजपसोबत आघाडीत असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गोवा फॉरवर्ड या दोन पक्षांना त्यांच्या प्रत्येकी तीन आमदारांसह आघाडीतून बाहेर काढून अपक्ष आमदारांनाही गळाला लावून राज्यात सत्तास्थापना करण्याची स्वप्ने काँग्रेस पक्ष पाहत होता. परंतु, ते होणे सोडाच, त्याआधी काँग्रेसचेच दोन आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले, आणि काँग्रेसला मोठा दणका मिळाला. मार्च, २०१७ मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे १३, काँग्रेसचे १७ तर मगोप आणि गोवा फॉरवर्डचे प्रत्येकी आमदार निवडून आले होते. यानंतर भाजपने मगोप, गोवा फॉरवर्ड आणि तीन अपक्ष यांच्या साथीने मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन केले. कालांतराने ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंह राणे यांचे पुत्र वाळपईचे आमदार विश्वजित राणे हेदेखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले, पोटनिवडणुकीत विजयीदेखील झाले. यामुळे भाजप १४ आणि काँग्रेस १६ असे संख्याबळ झाले. त्यानंतर आता पर्रीकरांच्या आजारपणात राजकीय संधी शोधणाऱ्या काँग्रेसला हा आणखी एक धक्का बसला आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@