अल्पना कला स्पर्धा-२०१८ अंतर्गत आज‘तरुण भारत’तर्फे शेंदुर्णीत रांगोळी स्पर्धा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |
 
 
अल्पना कला स्पर्धा-२०१८ अंतर्गत आज
‘तरुण भारत’तर्फे शेंदुर्णीत रांगोळी स्पर्धा


शेंदुर्णी, १५ ऑक्टोबर
‘जळगाव तरुण भारत’ने नवरात्रोत्सवानिमित्त शेंदुर्णी येथे मंगळवार, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ दरम्यान सर्वांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा पारस जैन मंगल कार्यालय येथे होणार असून त्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
स्पर्धा संपल्यानंतर परीक्षक परीक्षण करतील आणि नंतर त्याच स्थळी सायंकाळी ७ वाजता बक्षीस समारंभ होईल.
 
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.त्यासाठी - राणी लक्ष्मीबाई सहकारी पतसंस्था, पारस जैन मंगल कार्यालय शेंदुर्णी याठिकाणी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच अतुल जहागिरदार मो. ९५७९७४३४५५ यांच्याशी संपर्क साधावा. सर्व स्पर्धकांनी रांगोळी स्वतः आणावी. रांगोळी काढण्यासाठी ४ बाय ४ आकाराची जागा आखून देण्यात येईल. त्यातच रांगोळी काढावी लागेल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक, प्रायोजक तथा संयोजक राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा शोभा थोरात, उपाध्यक्षा साधना फासे, कार्यकारी संचालक रवींद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.

आकर्षक बक्षिसे
स्पर्धेतील प्रथम विजेत्याला रू.१००१/, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला रू.७०१/, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला रू.५०१/-, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर २ उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रू. २०१ अशी एकूण ५ बक्षिसे आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

विशेष सहकार्य
राणी लक्ष्मीबाई सहकारी पतसंस्था शेंदुर्णी
 
@@AUTHORINFO_V1@@