सुबोधचे निळे डोळे मला भावले : सोनाली
महा एमटीबी   16-Oct-2018

 


 
 
 
मुंबई : ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या चित्रिकरणाच्या वेळीची एक आठवण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शेअर केली आहे. सुबोध यांच्या निळ्या डोळ्यांकडे त्या पाहतच राहिल्या. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमात सोनाली या सुलोचना दीदींची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेते सुबोध भावे हे डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या प्रमुख भूमिकेत दिसतील.
 
 
 
 
 
 
या सिनेमाच्या सेटवर जेव्हा पहिल्यांदा सोनाली यांनी सुबोध भावे यांना डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या लूकमध्ये पाहिले. तेव्हा सोनाली या सुबोध यांच्या निळाशार डोळ्याकंडे एकटक पाहतच राहिल्या. भूमिकेसाठी सुबोध यांनी डोळ्यांना निळे लेन्स लावले होते. तु आधी गॉगल लाव, मी फक्त तुझी मैत्रिण आहे. पण इतका वेळ मी तुझ्याकडे पाहतेय. मलाच संकोच वाटू लागला आहे. असे त्यांनी सुबोद यांना म्हटले. १९६० च्या दशकातील मराठी सिनेसृष्टीचे दर्शन घडविणारा आणि डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या जीवनावर आधारित असलेला हा सिनेमा येत्या ८ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/