गोव्यात काँग्रेसला धक्का; दोन आमदारांचा राजीनामा
महा एमटीबी   16-Oct-2018


 


पणजी : गोव्यातील काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर या दोघांनी राजीनामा दिला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या दोघांनी राजीनामे दिले. लवकर हे दोघे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गोव्यात सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या काँग्रेसला हा मोठा धक्का मनाला जात आहे.

 

दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर हे दोघे सकाळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीला दिल्ली येथे गेले होते. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्क वर्तवण्यात येत होते. अखेर या दोघांनी शाह यांच्या भेटीनंतर राजीनामा दिला व लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. सुभाष शिरोडकर यांनी यावेळी सांगितले की, "आम्ही लवकरच भाजपात प्रवेश करणार असून आमच्यासोबत अन्य ३ ते ४ आमदार येणार आहेत."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/