‘कुछ कुछ होता है’ झाले २० वर्षांचे
महा एमटीबी   16-Oct-2018

 

 

 
 
 
मुंबई : २० वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच दिग्दर्शक करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आज या गोष्टीला २० वर्षे पूर्ण झाली असल्याने करण जोहर भलताच खुशीत आहे. ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा आजही टीव्हीवर लागला की प्रेक्षक तो आवर्जून पाहतात. हा सिनेमा तर हिट ठरलाच. पण त्यातील गाण्यांनीही रसिक प्रेक्षकांवर जादू केली होती. पण विशीत पदार्पण करणाऱ्या बॉलिवुडमधील या अजरामर कलाकृतीविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
 
 

म्हणून ‘कुछ कुछ होता है’ ची सुरुवात या गाण्याने होते.....

 

 
 

एक दिग्दर्शक म्हणून करण जोहरचा हा पहिलाच सिनेमा होता. परंतु या सिनेमातील पहिलाच सीन करणला काढावा लागला होता. सिनेमाची सुरुवात एका डेंटिस्टच्या क्लिनिकपासून होणार होती. त्यानंतर कोई मिल गया या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले. या गाण्यापासून सिनेमाची सुरुवात कर असा सल्ला शाहरुखने करणला दिला होता. हा सल्ला अमलात आणण्यात आला. डेंटिस्ट क्लिनिकचा सीन मी अंत्यत वाईट पद्धतीने दिग्दर्शित केला होता. अशी कबूली खुद्द करण जोहरने एका मुलाखती दरम्यान सांगितले.

 
 

हिरोईन मिळणे झाले होते मुश्किल!

 
 

 
 

या सिनेमातील टीनाच्या भूमिकेसाठी तब्बल आठ अभिनेत्रींनी नकार दिला होता. आता ऐनवेळी हिरोईन आणणार कुठून? स्क्रीप्टही बदलता येणार नव्हती, अशाप्रकारे करणची चांगलीच पंचाईत झाली होती. आदित्य चोप्रा आणि शाहरुख या दोघांनीही टीनाच्या भूमिकेसाठी राणी मुखर्जीचे नाव सुचवले. पण राणी त्यावेळी गुलाम सिनेमाच्या चित्रिकरण करत होती. करण घाबरतच राणीकडे याबाबत विचारण्यास गेला. पण राणीने करणची अडचण समजून घेत या भूमिकेसाठी होकार दिला. सिनेमातील काजोलने साकारलेली अंजलीची भूमिका जितकी प्रसिद्ध झाली. तितकीच राणीने साकारलेली टीनादेखील प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/