...तरी भारतीय अर्थव्यवस्था उत्तमजनता सहकारी बँकेच्या चर्चासत्रात रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचा विश्‍वास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |
 
 
 

...तरी भारतीय अर्थव्यवस्था उत्तम
जनता सहकारी बँकेच्या चर्चासत्रात रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचा विश्‍वास
जळगाव, १५ ऑक्टोबर
जागतिक अर्थव्यवस्था बिकट असली तरी भारतीय अर्थव्यवस्था उत्तम आहे, असे प्रतिपादन जळगाव जनता सहकारी बँकेच्या चर्चासत्रात रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केला आहे.
सतीश मराठे यांच्यासोबत रविवार, १४ रोजी संध्याकाळी ७ वाजता हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे जळगाव जनता सहकारी बँकेने आपल्या व्यावसायिक ग्राहकांचे चर्चासत्र आयोजित केले होते. सतीश मराठे यांनी हितगुज साधताना सर्वप्रथम त्यांच्या रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी नियुक्तीचा प्रवास विशद केला.
सध्याची आर्थिक परिस्थिती व एकदंरीतच जागतिक घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याचा उहापोह केला.आजची जगभरातील आर्थिक परिस्थिती जरी बिकट असली तरी भारतीय अर्थव्यवस्था उत्तम असल्याचे नमूद केले. शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील उत्पादननिर्मिती यात वाढ होत आहे. जगभरात ज्या घटना घडत आहेत, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रुपयाचे अवमूल्यन व उद्योग-व्यवसायावरील त्याच्या परिणामांचा त्यांनी उल्लेख केला.एन.पी.ए.चे वाढत्या प्रमाणाचा परिणाम बँकिंग क्षेत्रावर होत आहे. बहुतेक नागरी सहकारी बँका ढशलहपेश्रेसू चा वापर करून उत्तम सेवा देत आहेत. उद्योग व्यवसायात ॠऊझ मधील उत्पादनांचे उेपींीळर्लीींळेप कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. उेपींीळर्लीींळेप ३० टक्केवरुन १५टक्के वर आल्याचे त्यांनी नमूद केले. यात वाढ होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उद्योजकांनी त्यांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा करून मार्केटमध्ये सादर करावेत, जेणेकरून चांगले परिणाम दिसून येतील. आज जरी आर्थिक स्थिती बिकट असली तरी येत्या २-३ महिन्यात परिस्थितीत सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सतीश मराठे यांनी उद्योजकांच्या शंकांचे समाधान आणि व्यवसायातील अडचणींबाबत मार्गदर्शन केले. उद्योजकांनी शंका अथवा अडचणी जळगाव जनता सहकारी बँकेमार्फत त्यांच्याकडे पोहोच केल्यास त्या शासनाच्या संबंधित अधिकारी अथवा मंत्री महोदय यांच्याकडे सादर करून त्याचेदेखील समाधान करण्यात येईल. उपस्थित उद्योजक ग्राहकांचा परिचय बँकेचे महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल यांनी करून दिला. सतीश मराठे यांचे स्वागत व सत्कार बँकेचे ग्राहक तथा प्रसिद्ध व्यावसायिक प्रेम कोगटा यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविकात बँकेचे अनिल राव म्हणाले की, बँकेचा व सतीशजींचा ४० वर्षांपासूनचा संबंध आहे. त्यांचा सहकार भारतीच्या स्थापनेपासून सहकार भारतीत सहभाग आहे तसेच बँकेचे संस्थापक स्व.डॉ.अविनाशदादा आचार्य यांचासुद्धा सहकार भारतीच्या स्थापनेपासूनच राहिला. आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीदेखील सांभाळली होती.
मराठे हे चांगले बँकर असून डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर, जनकल्याण सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व युनायटेड वेस्टर्न बँकेच्या अध्यक्षपदापर्यंत जबाबदारी पार पाडली आहे.त्यांच्या या सर्व ज्ञानाची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांची रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. यामुळे सहकारी बँकांना त्यांच्या अडीअडचणी रिझर्व्ह बँकेकडे मांडण्यास मदत होणार आहे.
अनिल राव यांनी बँकेच्या चौफेर वाटचालीचा व प्रगतीचा आढावा घेत येत्या ५ वर्षात बँकेचा व्यवसाय दुप्पट होईल असा विश्वास व्यक्त केला.सूत्रसंचालन बँकेच्या अधिकारी नीलम जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन बँकेच्या मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी आनंदा वाणी यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@