रविना टंडन विरोधात खटला दाखल
महा एमटीबी   16-Oct-2018

 

 

 
 
 
पाटणा : बॉलिवुड अभिनेत्री रविना टंडनविरोधात बिहार येथील मुझफ्फरपूर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. एका वकिलाने हा खटला दाखल केला असून रविना टंडन यांच्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
  

१२ ऑक्टोबर रोजी रविना टंडन मुझफ्फरपूर येथे एका हॉटेलच्या उद्घाटन समारंभासाठी गेल्या होत्या. त्यांना पाहण्यासाठी त्यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. या गर्दीमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होती. याप्रकरणी हॉटेलचे मालक प्रणव कुमार आणि उमेश सिंग या पितापुत्रांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हॉटेलच्या या उद्घाटन समारंभामुळे आपण बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. याप्रकरणी २ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/