अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत अमळनेरसाठी २५ लाखांचा निधीआ. चौधरी यांच्या प्रयत्नांना यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |
 
 
अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत अमळनेरसाठी २५ लाखांचा निधी

आ. चौधरी यांच्या प्रयत्नांना यश

अमळनेर, १५ ऑक्टोबर
अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला असून यात २५ लाख रु निधी अमळनेर तालुक्यास मिळाला असल्याची माहिती आ. शिरीष चौधरी यांनी दिली.
सदर २५ लाख निधीतून अमळगाव येथे अल्पसंख्याक समाज शादीखाना बांधकाम करणे १० लाख, मारवड येथे कब्रस्थानास वॉल कंपाउंड करणे १० लाख, तसेच शिरसाळे येथे अल्पसंख्याक समाजासाठी सामाजिक सभागृह बांधकाम करणे ५ लाख आदी विकासकामे मार्गी लागणार आहेत. मंजुरीबाबत अल्पसंख्याक विकास विभागाने ४ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय काढला आहे. दरम्यान आ. शिरीष चौधरी यांनी सुरुवातीपासून सर्वसमावेशक धोरण ठेवत समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सर्व समाजात त्यांच्याबाबत समाधान आहे.
अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत अनेक गावांना विकासकामांची शिफारस त्यांनी केली होती. त्यापैकी तीन गावांना निधी मिळाला असून पुढील टप्प्यात उर्वरित गावांना निधी मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@