कर्तबगार नवदुर्गा - डॉ. राणी बंग
महा एमटीबी   15-Oct-2018


 

 

या नवरात्रात MahaMTB च्या ‘कर्तबगार दुर्गा’ या उपक्रमाद्वारे समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तुत्व गाजविणाऱ्या महिलांना दिलेली ही मानवंदना...

 

डॉ. राणी बंग, समाजासाठी वाहून घेतलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पत्नी म्हणून जरी त्यांची ओळख असली तरी त्यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्यात बरेच मोलाचे योगदान दिले आहे. समाजकार्याचा ध्यास घेतलेल्या राणी बंग यांच्या कार्याचा आढावा घेऊया...
 

> डॉ. राणी बंग या मुळच्या चंद्रपूर जिल्ह्यातला असून त्यांचे वडील प्रसिद्ध डॉक्टर होतो.

 

 
 

> एम.बी.बी.एस. केल्यानंतर राणी बंग यांचा विवाह प्रख्यात समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्याशी झाला. याच सोबत त्यांच्या समाजकार्याचा प्रवास सुरु झाला.

 

 
 

> त्यांनी 'स्त्रीरोगशास्त्र' या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. अमेरिकेच्या 'जॉन हॉपकिन्स' विद्यापिठातून ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ’ या विषयावरची पदवी त्यांनी १९८४ साली मिळवली.

 

 
 

> आदिवासी स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या आणि त्यांच्या भाव विश्वाचा वेध घेणारी "कानोसा" व "गोईण" ही दोन पुस्तके त्यांनी लिहली आहेत.

 

 
 

> त्यांना आजवर अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी त्यांनी मिळवली.

 
 
 

> त्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना २००३मध्ये महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार, तर २०१८चा पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

 
 
 

- अभिजीत जाधव

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/