माधुरी-वय विचारू नका
महा एमटीबी   13-Oct-2018

 


 
 
 
मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर एका मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. ‘माधुरी’ या सिनेमाद्वारे उर्मिला मातोंडकर या निर्मिती क्षेत्रात उतरत आहेत. ‘वय निचारू नका’ अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच तिचे ‘कच्चा लिंबू’ आणि ‘अगं बाई अरेच्चा२’ हे सिनेमे प्रदर्शित झाले होते.
 
 
 
 
 
उर्मिला मातोंडकर त्यांचे पती मोहसीन अख्तर मीर यांच्या साथीने या सिनेमाची निर्मिती करत असून ‘मुंबापुरी प्रोडक्शन्स’ असे त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे. स्वप्ना वाघमारे जोशी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. माधुरीची पहिली झलक चुकवू नका आणि आपली माधुरी ओळखयला विसरू नका असे कॅप्शन लिहून त्यांनी या सिनेमाचा टीझर इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. येत्या ३० नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/