अजब गजब! क्लोनिंगद्वारे जन्मली म्हैस!
महा एमटीबी   13-Oct-2018

 


 
 
 
सांगली : म्हशीच्या क्लोनिंगद्वारे म्हशीची उत्पत्ती करण्याचा यशस्वी प्रयोग सांगली येथील चितळे डेअरीमध्ये करण्यात आला. क्लोनिंगद्वारे म्हशाचा जन्म झाल्याची भारतातील ही पहिलीच घटना आहे. जन्मलेल्या या म्हशीच्या मादी पिल्लाचे वजन तब्बल ३२ किलो आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी या म्हशीच्या मादी पिल्लाचा जन्म झाल्यामुळे तिचे नाव ‘दुर्गा’ ठेवण्यात आले आहे. जास्त दूध देणाऱ्या दुभत्या म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाद्वारे प्रजननाचा हा प्रयोग ‘ब्रम्हा’ प्रकल्पात करण्यात आला.
 

म्हशीला रेडकू झाले तर त्या म्हशीच्या दूधाचे उत्पादनावर परिणाम होतो. दूध उत्पादन वाढविण्यासाठी मादी पिल्लाचा जन्म कसा होईल यावर गेले ३ वर्षे चितळे डेअरीमध्ये संशोधन सुरू होते. अनेक रेड्यावर या प्रयोगासाठी संशोधन सुरू होते. महाबली या रेड्याच्या सिमेन्समदून स्त्रीबिजाचे विलगीकरण करण्यात आले. ‘मुहार्ध’ जातीच्या म्हशीच्या गर्भात या स्त्री बीजाचे रोपण करण्यात आले. सर्वसाधारण म्हशीकडून १२०० लीटर दूध मिळते. आता या प्रयोगामुळे मात्र ‘मुहार्ध’ जातीच्या म्हशीकडून ४ हजार लीटर दूध उत्पादन मिळविणे शक्य होणार आहे. सांगलीमधील हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे हरियाणा राज्य देखील यासाठी पुढे सरसावले आहे. हरियाणामद्ये राज्य शासनाअंतर्गत १ लाख २० हजार स्त्री बीजांची नोंदणी करण्यात आली आहे. संकरित गाईंच्या स्त्री बीजांची श्रीलंका, व्हिएतनाम येथे निर्याता केली जाणार आहे. अशी माहिती एबीएसचे मालक विश्वास चितळे यांनी दिली. 

 
जागतिक पातळीचा विचार केला तर भारतात दुभत्या जनावरांची संख्या जास्त आहे. परंतु जगभरातील देशांच्या तुलनेत दूध उत्पादनात भारताचे केवळ १० टक्के योगदान आहे. दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी असे नवनवीन प्रयोग तसेच प्रयत्न केले जात आहेत. दरवर्षी चितळेंच्या डेअरीमधून ३० ते ४० लाख सिमेन डोसचे उत्पादन ब्रम्हा प्रकल्पाद्वारे केले जाते. काऊज टू क्लाइड हा उपक्रम चितळे समुह गेली ७ वर्षे राबवत आहे. या उपक्रमाद्वारे १० हजार गाईम्हशींची संगणकाद्वारे नोंद करण्यात आली असून त्यांच्या आरोग्याची देखभाल करण्यात येते.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/